महाराष्ट्र मुंबई

प्रियकराच्या पहिल्या प्रेयसीनं दुसऱ्या प्रेयसीवर घडवून आणला बलात्कार; शुटिंगही केलं…

मुंबई : प्रियकऱ्याचे दुसऱ्या मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने पहिल्या प्रेयसीने धक्कादायक पाऊल उचललं आहे. प्रियकराच्या दुसऱ्या प्रेयसीवर दोघांना बलात्कार करायला लावून तिने या प्रकरणाचं चक्क शुटिंग केलं आहे.

भिवंडीतील गायत्री नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

प्रियकराचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण आरोपी तरुणीला लागली होती. त्यानूसार तिने योजना आखून हा धक्कादायक प्रकार घडवून आणला. त्यानंतर पीडितेला शूटिंग दाखवून आरोपी मुलगी ब्लॅकमेल करत होती.

पीडितेनं याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्यासोबत झालेली घटना पोलिसांना सांगितली. 

22 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या प्रेयसीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

IMPIMP