चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण

नवी दिल्ली |  कोरोना महामारीनं अवघ्या जगामध्ये मोठी हानी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. चीनमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

चीनमधील महत्त्वाचं शहर असणारं शांघायमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता असल्यानं भारतात देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमध्ये सध्या कोरोनानं थैमान घातलं आहे. शेनयांग या महत्त्वाच्या शहरात संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचे आदेश चीन सरकारने दिले आहेत. तेथील तब्बल 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ आली आहे.

चीनमध्ये कोरोना परिस्थिती भयानक रूप घेत असल्यानं तेथील सरकारनं झीरो कोविड धोरण अवलंबले आहे. कोरोना रूग्णसंख्या आढळली की लगेच लाॅकडाऊन करण्यात येत आहे.

चीनमध्ये आरोग्य खात्यानं नवीन 4,770 रूग्णांची नोंद केली आहे. परिणामी चीनमधील महत्त्वाचं औद्योगिक शहर असणारं शेनयांग बंद करण्यात आलं आहे.

चीनमध्ये एका दिवसात तब्बल 4 हजार रूग्ण आढळले आहेत. बहुतांश रूग्णसंख्या ही ईशान्येकडील जिलींग प्रांतात आढळून आली आहे.

चीनमध्ये वर्षभरानंतर कोरोनामुळं दोघांचा मृत्यू झाला आहे. परिणामी जगामध्ये पुन्हा चिंता पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील सुचना जारी केल्या आहेत.

दरम्यान, सध्या जगात रशिया-युक्रेन युद्धानं भयानक परिस्थिती असताना अचानकपणे चीनमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यानं विविध चर्चा रंगल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्‍या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त

सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”