मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाला रोकण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 12 हजार 160 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.
राज्यात आज 68 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 578 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय.
गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील रूग्णसंख्या ही दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, आज मुंबईत 8 हजार 82 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत येत्या दोन दिवसात मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मेट्रोबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!
कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…
…म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ
अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार