झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | धोकादायक मांकीपॉक्स जगभर वेगाने पसरत आहे. आता स्वित्झर्लंड आणि इस्रायलमध्ये या विषाणूची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. दोन्ही देशांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे.

हा विषाणू अनेक युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये आढळून आला आहे. विशेषतः आफ्रिकन देशांतून परतलेल्या लोकांवर याचा परिणाम होत आहे.

अलिकडच्या आठवड्यात, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इटली, पोर्तुगाल, स्पेन आणि स्वीडन तसेच अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मंकीपॉक्सची 100 हून अधिक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. अशा परिस्थितीत हा विषाणू पसरण्याची शक्यता बळावली आहे.

तेल अवीवच्या इचिलोव्ह हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने शनिवारी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की हा विषाणू एका 30 वर्षीय व्यक्तीमध्ये पसरला जो नुकताच पश्चिम युरोपमधून मंकीपॉक्सच्या लक्षणांसह परत आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की हा माणूस परदेशात मंकीपॉक्सच्या बळीच्या संपर्कात आला होता. सध्या त्यांना हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

“श्रीकृष्णरूपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडणार” 

केतकी चितळेवर शेजाऱ्यांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

‘गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा’; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी