“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

कराची | क्रिकेट हा सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ होण्याच्या मार्गावर आहे. अनेक देशांमध्ये क्रिकेटला वाव मिळत आहे. अशात आता तर क्रिकेटच्या ट्वेंटी ट्वेंटी या प्रकारामुळं क्रिकेट अधिक वेगवान झालं आहे.

क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि रोमांचक प्रकार म्हणून टी ट्वेंटी प्रकारला ओळखलं जात आहे. सध्या विविध देशांमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या आयपीएलला ओळखण्यात येतं. अशात आयपीएलच्या तोडीस तोड स्पर्धा घेण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे.

भारताप्रमाणंच पाकिस्ताननं पाकिस्तान प्रिमीअर लीग चालू केली आहे. सध्या पीएसएलचे सामने चालू आहेत. या स्पर्धेत अनेक देशांचे दिग्गज खेळाडू आपल्या खेळाचे नमुने सादर करताना पाहायला मिळत आहेत.

अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाकडून खेळत आहे. राशिद खान पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राशिद खान फलंदाजी आणि गोलंदाजीत आपली छाप सोडत आहे.

राशिद खान त्याच्या चाहत्यांना आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनानं अचंबित करत आहे. पेशावर जाल्मीविरुद्धच्या सामन्यात राशिद खानने शेवटच्या षटकात मारलेल्या फटक्याने चाहत्यांची मने जिंकली. त्या शॉटचा व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राशिद खान फलंदाजी करताना दिसत आहे. ज्यामध्ये राशिद खान मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रसंगी विचार बदलून त्याने एक विचित्र शॉट खेळला.

राशिदनं आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आता याला काय नाव द्यावे? मला खरोखर फलंदाजी प्रशिक्षकाची गरज आहे.” राशिद खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी सोडत नाही.

दरम्यान, राशिदनं पीएसएलच्या या सिझनमध्ये जोरदार प्रदर्शन केलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर राशिद चमकदार कामगिरी करत आहे. राशिदला आयपीएलमध्ये अहमदाबाद संघानं घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

 मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…” 

काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं!