अखेर रश्मी बागलांची प्रतिक्षा संपली; उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई | करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल यांना अखेर शिवसेनेकडून AB फॉर्म देण्यात आला आहे. शुक्रवारी 4 ऑक्टोबरला आपण फॉर्म भरणार असल्याचं रश्मी बागल यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमदार नारायण पाटील यांना डावललं जाईल म्हणून करमाळ्यतले शिवसैनिक नाराज होते. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.   

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या काही नेत्यांना AB फॉर्मचं वाटप करण्यात आलं. त्यादिवशी रश्मी बागलदेखील मातोश्रीवर दिवसभर बसून होत्या. मात्र त्यांना AB फॉर्म मिळाला नाही.

पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला आहे. आता आपण जोमाने काम करायला हवं. पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. ती पार पाडण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या साथीची आणि पाठिंब्याची गरज आहे, अशी फेसबुक पोस्ट रश्मी बागल यांनी लिहीली आहे. 

दरम्यान, रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करमाळ्याच्या राजकरणात मोठे बदल झालेत. येत्या निवडणुकीत करमाळावासीय आपली पसंती कुणाला देतात, हे पाहणं महत्वाचं आहे. 

महत्वाच्या बातम्या-