असाही एक मुख्यमंत्री, स्वत:च्या सासऱ्यांचं निधन झालं असताना उद्धव ठाकरेंनी नियोजित बैठक घेतली!

मुंबई |  सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे वडिल माधवराव पाटणकर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. अशा परिस्थितीत देखील स्वत:चं कोटुंबिक दु:ख बाजूला सारत उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतची नियोजित बैठक घेतली.

घरात दुःखाचा आघात झाला असताना, मुख्यमंत्री यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली व्हीडिओ कॉन्फरन्सिंग रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे आमदार कपील पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

कपील पाटील यांनी यासंबंधी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे आज दुःखद निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटूंबियांच्या दुःखात आपण सारे सहभागी आहोत.”

“निधनाची बातमी कळताच मी शिक्षण आयुक्त यांना मेसेज केला. शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री यांच्या Video Conference बद्दल विचारणा केली. तेव्हा शिक्षण आयुक्त यांनी खालील मेसेज पाठवला – ‘Yes. Still he is taking the VC. Really appreciated. He took your name and other experts to involve in pilot for Tablets / online studies.’ घरात दुःखाचा आघात झाला असताना, मुख्यमंत्री यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली VC रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे”

कपील पाटील यांची फेसबुक पोस्ट-

 

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

-सुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत

-“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”

-“आपलं ते कार्ट अन् दुसऱ्यांचा तो बाब्या बोलणं बंद करा”

-“कोरोना रुग्णांसाठी मुकेश अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या”