मुंबई | नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा पुष्पा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. रश्मिकाचा हा नवा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.
रश्मिका आणि अल्लु अर्जुनचा पुष्पा सिनेमा फक्त दक्षिणेतच नाही तर हिंदी बॉक्स ऑफिसवरदेखील धुमाकुळ घालत आहे. फक्त दक्षिणेतच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही रश्मिकाने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचं नाव आता आणखी एका यादीत सामील झालं आहे. पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर रश्मिकाचं नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सामील झालं आहे.
एका चित्रपटासाठी रश्मिका 3 ते 4 कोटींचं मानधन घेत आहे. फक्त इतकच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिकाची एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर आहे.
रश्मिका बंगळुरूमधील एका आलिशान व्हिलाची मालक आहे. या आलिशान व्हिलाची किंमत 8 कोटींच्या घरात असल्याचं एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.
2020 साली रश्मिकानं हैदराबादमध्ये एक घर खरेदी केलं आहे. तर गोव्यात देखील रश्मिकाची प्रॉपर्टी असल्याचं म्हटलं जातं. Audi Q3 सह रश्मिकाकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.
रश्मिकाला लक्झरी बॅग्जची आवड असल्याने तिच्याकडे लक्झरी बॅग्जचं कलेक्शन देखील आहे. रश्मिकाकडे असलेल्या एका बॅगची किंमत तब्बल 3 ते 4 लाखांपर्यंत आहे.
दरम्यान, रश्मिकाने 2016 साली कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने सलग अनेक हिट चित्रपट दिले. सिद्धार्थ मल्होत्रा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“56 इंचाची छाती आहे, तर मग घाबरायची काय गरज? पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा…”
क्रिकेट जगतात खळबळ! शेन वाॅर्नचा खळबळजनक खुलासा म्हणाला,”पाकिस्तानच्या कॅप्टनने…”
“आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा रामभरोसे नाही, त्यांचा बालही बाका होणार नाही”
मॉडर्न नवरीची धमाकेदार एन्ट्री, पाहुणेही झाले अवाक; तुम्हीही व्हिडीओ पाहतच राहाल
राखी सावंतला भेडसावतेय ‘ही’ भीती, बिग बॉसच्या घरात केला खुलासा