नागपूर महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा हा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार!

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक मोठमोठे धक्के बसत आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि पुसदचे विद्यमान आमदार मोहनराव नाईक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. मुलगा इंद्रनील शिवसेेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मोहनराव नाईक यांनी पुसद विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत आपण शिवसेनेत प्रवेश जाहीर केला असल्याची माहिती मिळत आहे. 

पुसदमध्ये नाईक घराण्याची एकहाती सत्ता राहिली आहे. पुसदने आतापर्यत वसतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री दिले आहेत. आजही पुसदमध्ये मोहनराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांची पत्नी नगरपरिषदेच्या अध्यक्षा आहेत. 

विदर्भात मोहनराव नाईक हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. अलिकडेच नीलय यांनी भाजपची कास धरली. त्यांना भाजपने विधान परिषदेची आमदारकीही दिली होती.

मोहनराव नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम केला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतो मी पवारांसोबतच राहणार; ‘कोणाच्याही संपर्कात नाही’

-यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका- शरद पवार

-आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड

-प्रकाश आंबेडकरच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!

-खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकरांचा मार्ग मोकळा??

IMPIMP