Top news

मुंबईतील ‘या’ 18 वर्षीय तरुणाच्या कंपनीत रतन टाटांकडून गुंतवणूक

मुंबई | टाटा ग्रृपचे चेअरमन रतन टाटा यांनी मुंबईतील एका 18 वर्षीय तरुणाच्या ‘जेनरिक आधार’ या फार्मसीमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. या कंपनीच्या फाऊंडरचं नाव अर्जुन देशपांडे असून त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे दोन वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू केल्याचं कळतंय.

अन्य ऑनलाइन फार्मसी कंपन्यांच्या मानाने जेनरिक आधारमध्ये औषधे स्वस्त दरामध्ये विकली जातात. देशपांडेने या डीलबाबत माहिती दिली मात्र या कराराच्या किंमतीबाबत माहिती मिळालेली नाही. 3 ते 4 महिन्यांपूर्वी त्याने टाटांना याबद्दल सांगितलं होतं.

रतन टाटांनी अर्जुनच्या कल्पनेमध्ये उत्सुकता दाखवली आणि त्यांना देखील त्याचा मेंटर बनून काम करावसं वाटलं. अर्जुनने दिलेल्या माहितीनुसार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणारे.

दरम्यान, मुंबईच्या या तरूणाने दोन वर्षांपूर्वी जेनरिक आधारची सुरूवात केली होती. आता कंपनीकडून वार्षिक 6 कोटींची विक्री होते. अर्जुन देशपांडेने त्याची कंपनी सुरू करताना यूनीक फार्मेसी एग्रीगेटर बिजनेस मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये थेट मॅन्युफॅक्चरर्सकडून औषधांची खरेदी करून त्याची विक्री किरकोळ दुकानदारांना केली जाते.

महत्वाच्या बातम्या-

-पक्षाला ज्यांनी शिव्या घातल्या त्यांना तिकीट दिलं; उमेदवारी डावलल्यानंतर खडसेंचं आक्रमक रूप

-गरीबांच्या खात्यात साडे सात हजार रूपये जमा करा; राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

-पदवी, पदव्युत्तर परीक्षांबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय, वाचा कुणाच्या होणार परीक्षा अन् कुणाच्या नाही…!

-दिग्गजांना बाजूला सारत भाजपने विधानपरिषदेसाठी 4 उमेदवार केले जाहीर!

-सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय, म्हणून त्यांना काही फरक पडत नाही- निलेश राणे