मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची

नवी दिल्ली | सरकारने सोमवारी नीलाचल इस्पात निगम लिमिटेडला (NINL) टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्स विक्री करण्याची मंजुरी दिली आहे. आर्थिक कॅबिनेट समितीने 93.71 टक्के शेअर्ससाठी टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्सच्या सर्वोच्च बोलीला मंजुरी दिली आहे.

हा करार सुमारे 12100 कोटी रुपयांचा असेल. NINL हा चार CPSE आणि ओडिशा सरकारच्यादोन राज्य सार्वजनिक उपक्रमांचा जॉईंट वेंचर आहे. सरकारच्या या कंपनीत कोणतीही इक्विटी नाही.

PSU मंडळाच्या विनंतीवर आणि ओडिशा सरकारच्या संमतीच्या आधारावर CCEA ने 8 जानेवारी 2020 रोजी NINL च्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीला तत्त्वत: मान्यता दिली होती.

NINL 4 CPSE – MMTC, NMDC, BHEL, MECON आणि 2 ओडिशा सरकारचे PSU – OMC आणि IPICOL हे संयुक्त उपक्रम आहेत. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थारन विभागाला व्यवहार करण्यासाठी अधिकृत केलं होतं.

अधिकृत माहितीनुसार, ओडिशा सरकारसह (Government of Odisha) त्यांच्या OMC आणि IPICOL या कंपन्यांचाही यात समावेश होता. यात त्यांची 32.47 टक्के भागीदारी होती.

आता सरकारच्या मंजुरीनंतर, या करारामुळे Air India नंतर मोठ्या घाट्यात असलेली ही सरकारी कंपनी रतन टाटांच्या नावे होणार असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या- 

‘धोका टळलेला नाही…’; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा 

‘असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं’; केसरकरांचा राणे पितापुत्रांवर हल्लाबोल!

“यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे जुन्यांना मूठमाती आणि नव्यांना गाजर दाखवणारा आहे”

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोदी सरकारनं उचललं मोठं पाऊल

“गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नाही”