1 जून पासून देशात लागू होणार ‘एक देश एक रेशन कार्ड’

नवी दिल्ली | ‘एक देश एक रेशन कार्ड’ ही योजना 1 जून पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहक एक रेशन कार्डाचा वापर देशभरात कोणत्याही ठिकाणी करू शकणार आहे.

‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलेट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलीटीची सुविधा देण्यात आली होती.

रामविलास पासवान यांनी या योजनचं ऑनलाईन उद्घाटन देखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशभरात ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती पासवान यांनी दिली आहे.

दरम्यान, या योजनेमुळे देशभरातील रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानातून स्वस्त धान्य खरेदी करू शकतात. तसेच या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

‘तुकडे तुकडे गँग’ अस्तित्वात नाही; गृह मंत्रालयाची कबुली

-सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा; राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर

-बाळासाहेबांनी हे खपवून घेतलं नसतं; आव्हाडांच्या त्या वक्तव्यावर राम कदम संतापले

-“राजमुद्रा हे छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय प्रतीक आहे त्याचा वापर मतांची भीक मागण्यासाठी नका”

-#मेरा_PM_झूठा_है ट्वीटरवर ट्रेंड; तब्बल 88 हजारांहून अधिक ट्वीट