बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री; छाप्यात ‘इतक्या’ लाखांचा माल जप्त

बारामती | रेशन धान्य दुकानात गरीबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला घेवून जाणारा टेम्पो बारामती-निरा मार्गावर होळ येथे पकडण्यात आला. टेम्पोसह 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर येथील दुकानदार शशिकांत शहा आणि टेम्पोचालक शशिकांत कदम यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान या टेम्पोमधून 18 हजार 700 रुपयांच्या 17 पिशव्या गहू, 52 हजार 500 रुपये किमतीच्या 35 पिशव्या तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान,  बारामती-निरा रस्त्यावर होळ गावच्या हद्दीत आठ फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.  सापळा लावत टेम्पो पकडण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

-चिंताजनक! पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 823 रुग्ण

-देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे; 24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

-‘भाईजानने कधीही कोणालाही त्रास दिला नाही’; ‘या’ काँग्रेस आमदाराचा सलमानला पाठिंबा

-‘ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केलं?’; संजय राऊतांचा मोदींना सवाल

-सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा; या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब