Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

राऊत दांपत्याची एकत्र चौकशी होणार, वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

Sanjay Raut with Varsha Raut
Photo Credit: Facebook / @Mumbai HD

मुंबई | गोरेगाव पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) अटकेत असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांंच्याविरोधात आता ईडीला नवे पुरावे मिळाले आहेत.

प्रवीण राऊत (Pravin Raut) या संजय राऊतांच्या निकटवर्तीयांना राऊतांमुळे कनस्ट्रकशनचे काम मिळाले असल्याचा ईडीचा संशय आहेत. यात प्रवीण राऊत यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याचाही ईडीचा संशय आहे.

तसेच प्रवीण राऊत हे फक्त पडद्यावरचे कलाकार आहेत. या घोटाळ्याचा खरा सूत्रधार आणि पडद्यामागचा कलावंत संजय राऊत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यामागे ईडीची चौकशी लागली आहे.

संजय राऊत यांनी या पैशातून मुंबईत (Mumbai) घरे आणि अलिबागात (Alibaug) भूखंड विकत घेतल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. तसेच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावर देखील काही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

त्यामुळे आता या दांपत्याची एकत्रित चौकशी होणार आहे. आता राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे. उद्या (5 ऑगस्ट) त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली होती. संजय राऊत यांनी अलिबाग जमीन खरेदीचे व्यवहार त्यांच्या पत्नीच्या नावे केले आहेत.

त्यामुळे आता संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

मंगळसूत्र गळ्यात असलं की नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटतं त्यामुळे मी….- अमृता फडणवीस

पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वो‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

उच्च न्यायालयाची शिंदे गटाला महत्त्वाची सूचना!

भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी

“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”