“बाप-लेक जेलमध्ये जाणार, कोठडीचं सॅनिटायझेशन सुरूये”

मुंबई | शिवसेने नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद काल शिवसेना भवनात पार पडली. त्यानंतर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार भांडण चालू आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम सध्या चालू आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावर हा सर्व प्रकार चालू आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर भाजपकडून राऊतांना जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या अगोदरच ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार आहेत. हे तीन नेते लवकरच राज्याला कळतील, असं म्हटलं होतं.

राऊत यांनी पत्रकार परिषदेत मात्र हे तीन नेते कोणते याचं उत्तर दिलं नव्हतं. परिणामी विरोधी पक्षांकडून त्यांच्या पत्रकार परिषदेवर टीकाही करण्यात आली होती.

राऊत यांनी आता या टीकेलाही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. बाप बेटे जेलमध्ये जाणार, वेट अॅंड वाच, कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे, असं राऊत म्हणाले  आहेत.

किरीट सोमय्या आणि निल सोमय्या या पितापुत्रांवर राऊत यांनी टीका केल्याचं सध्या बोललं जात आहे. परिणामी आता राऊत यांनी उल्लेख केलेले दोन व्यक्ती जेलमध्ये कोणत्या प्रकरणात जाणार याची चर्चा आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्यावर आरोप केला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”