औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनकडून समर्थ, म्हणाली…

मुंबई | राज्यात अनेक वाद सुरू असताना एमआयएमच्या नेत्यांनी औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून नवा वाद निर्माण केला आहे. हा वाद काही केल्या मिटण्याचं नाव घेताना दिसत नाहीयं.

एमआयएमचे नेते अकबरूद्दीन औवेसी, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण या सर्वांनी कबरीचं दर्शन घेतल्यानं राज्यात वाद निर्माण झाला आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एमआयएमवर जोरदार टीका केली आहे. अशातच आता एमआयएमच्या समर्थनार्थ प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडननं पोस्ट केल्यानं वादात भर पडली आहे.

काही काळापुर्वी माझ्या मातृभूमिला असहिष्णू हे लेबल लावणं फॅशन बनलं होतं. यावरून आपण किती सहन करू शकतो हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग आता असहिष्णुता कुठं आहे, असा सवाल रवीनानं केला आहे.

लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतानाचा औवेसीचा फोटो शेअर केला होता. त्यावर देखील रवीनानं प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही सहनशील होतो आहोत आणि राहू. इथं कोणाचीही पुजा करता येते, हा एक स्वतंत्र देश आहे. इथं सर्वांना समान अधिकार आहेत, असं ट्विट रवीनानं केलं आहे.

दरम्यान, रवीना टंडन अचानकपणे या वादात सापडल्यानं सर्वत्र चर्चांणा उधाण आलं आहे. अशात आता राज्यातील राजकीय पक्षांनी देखील रविनावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण”

“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही” 

  “कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल

  “मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”

  Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज