मुंबई | मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईल, असा संतप्त इशारा आमदार रवी राणा यांनी सर्वांसमोर दिला आहे.
अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज विधानसभेत (vidhansabha) याचे पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभेत रवी राणा यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उभं राहून राणा यांची बाजू घेतली आणि राणा यांना बोलण्याची परवानगी देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर रवी राणा यांनी संपूर्ण कहानी सभागृहात मांडली.
आज मला आर आर पाटलांची आठवण येते. त्यांच्या सारखा गृहमंत्री या राज्याला पाहिजे. तुम्ही वाझे सारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल. या माझ्या भावना नाहीये, संपूर्ण समाजाच्या भावना आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही फोन करता हे महाराष्ट्राचं दुर्देवं, असं रवी राणा यांनी म्हटलं.
माझ्याविरोधात रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल केला. एवढं प्रेशर आहे. एवढं प्रेशर आहे की रवी राणा दिसला तर गोळी मारा असं सांगितल्या गेल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं. अशा प्रकारची परिस्थिती असेल आणि मी खोटं बोलत असेल तर पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. मी फाशी घेईल. मला फाशी द्या, असं रवी राणा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“ईडीची चिंता तुम्ही करू नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर…”
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
“बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी”
“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”
BMC चा नारायण राणेंना दणका! पुन्हा बजावली नोटीस