सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

मुंबई |  सिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे.

अशातच आमदार रवी राणा यांनी सचिन वाझे प्रकरणासंबंधी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातेश्री’ अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांचीही मनसुख हिरेन यांच्यासारखी हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.

सचिन वाझे यांच्या जीवाला धोका असल्यामुळे एनआयएने पूर्ण लक्ष ठेवून सचिन वाझेंना संरक्षण दिलं पाहिजे. तसंच त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवलं पाहिजे, अशी मागणीही रवी राणी यांनी केली आहे.

सचिन वाझे यांची एनआयएने केलेल्या चौकशीत जी माहिती सांगितली आहे. त्यावरुन महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून येत्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो, असा दावा रवी राणा यांनी केला.

केवळ परमसिंह यांना बाजूला करून हे प्रकरण संपणार नाही. या प्रकरणाचे सर्व धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत असल्याचंही राणा यांनी सांगितलं.

तसेच सचिन वाझे या प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयए या तपास संस्था करत आहे. त्यामुळे सचिव वाझे यांना प्लॅनिंग करण्यात कोणी मदत केली हेदेखील लवकरच तपासादरम्यान बाहेर येईल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

तसेच, सचिन वाझे याचं नाव या प्रकणात समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी परमबीर सिंह यांच्या बदलीची मागणी विरोधकांनी केली होती. त्यानंतर सरकराने मुंबई पोलिस दलात खूप मोठे बदल केले आहेत.

दरम्यान, भाजपचे नेेते नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विटदेखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-