खेळ

…म्हणून धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं; अखेर रवी शास्त्री यांनी मौन सोडलं!

मुंबई | वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. यानंतर अनेक चाहत्यांनी टीम प्रशासन आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला का पाठवले? असे प्रश्नही उपस्थित केले.

महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला का पाठवले? याच प्रश्नाचं उत्तर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलं आहे. धोनी लवकर फलंदाजीसाठी यावा आणि तो लवकर बाद होईन परत जावा ही गोष्ट आम्हाला कोणालाच नको होती, असं स्पष्टीकरण शास्त्री यांनी दिलं आहे. ते ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलत होते.

हा संघाचा निर्णय होता. या निर्णयात सगळ्यांचा सहभाग होता. हा सामना खूप महत्वाचा होता. आणि काहीही झालं तरी धोनी ऑल टाईम बेस्ट फिनिशर आहे, असं त्यांनी म्हटलं.

धोनी लवकर बाद होईन परत गेला असता तर आम्ही लक्ष्यापासून भरकटलो असतो. आम्हाला त्याच्या अनुभवाची गरज होती, असं ते म्हणाले.

धोनीला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवणे आमच्यासाठी एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नव्हते, असं विधानही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्याने भारताचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

IMPIMP