मुंबई | विराट कोहलीने (Virat kohli) कसोटी संघाचं कर्णधार पदही सोडलं असल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. त्याने काही वेळापूर्वीच कर्णधारपद सोडत असल्याचं ट्विट केलं आहे.
गेल्या काही दिवसापासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (Bcci)असं चित्र निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. सर्वात आधी विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला ते सोडू नको असं सांगितलं असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी बीसीसीआयने (Bcci) त्याच्याकडील एकदिवसीय क्रिकेटचंही कर्णधारपद काढून घेतलं, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचंही दिसून आलं आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.
विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतरमाजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक भावनिक संदेश पाठवला आहे. व्यक्तिगत पातळीवर माझ्यासाठी हा वाईट दिवस आहे. जगातील एका यशस्वी कसोटी कर्णधाराचा आज आठ वर्षांचा कार्यकाळ संपला, असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.
विराट मान उंच ठेव. तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलय. तू भारताचा सर्वात यशस्वी आणि आक्रमक कॅप्टन आहेस. माझ्यासाठी व्यक्तीगत पातळीवर हा वाईट दिवस आहे. ही टीम म्हणजे भारताचा ध्वज असून आपण दोघांनी मिळून हा संघ बांधला, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले, असं विराट म्हणाला.
कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे, असंही विराटने सांगितलंय.
दरम्यान, विराटच्या या टि्वटनंतर बीसीसीआयने टि्वट करुन त्याला शुभेच्छा दिल्या. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तमाशा बनवलाय माझा’, ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ढसा ढसा रडला ‘हा’ नेता, पाहा व्हिडीओ
नोकरीची सुवर्णसंधी; दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
तज्ज्ञ म्हणाले,’Omicron ची एकदा नाहीतर इतक्या वेळा लागण होऊ शकते’
काळजी घ्या! कोरोना रूग्णसंख्येत वाढ सुरूच, वाचा आजची ताजी आकडेवारी
सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड