“…तर त्या कर्मचाऱ्याला कपडे काढून फटकवा”

अमरावती | सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातलं होतं. त्यावेळी हातातोंडाशी आलेला पिक अतिवृष्टीमुळे वाया गेलं. तर अनेकांच्या शेतातील माती देखील वाहून गेल्याचं पहायला मिळालं होतं.

अतिवृष्टीमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे आता महावितरण कंपन्यांनी शेतकऱ्याची वीज कापण्याचा सपाटा लावला आहे.

रब्बी हंगामात ऐन मोक्याच्या तोंडावर महावितरण कंपन्यांनी कारवाई केल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. अशातच आता शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपेकर यांनी महावितरण कंपन्यांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं तर महावितरण कंपन्याच्या कर्मचाऱ्याचे कपडे काढून त्याला फटके मारा, असं वादग्रस्त वक्तव्य रविकांत तुपेकर यांनी केलं आहे.

वेळ पडली तर मला फोन करा, असंही रविकांत तुपेकर यावेळी म्हणाले आहेत. तर कंपन्या असच करत राहिल्या तर महावितरण कार्यालये जाळायला देखील काही पुढे मागे पाहणार नाही, असंही रविकांत तुपेकर म्हणाले आहेत.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तरीही सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही, असा आरोप त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला आहे.

येत्या 11 नोव्हेंबरपर्यंत सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचं मोठं आंदोलन उभारू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

सोयाबीन, कापूस, संत्री उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

तातडीने केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘तुमच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात’; राजू शेट्टींचा थेट इशारा

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”