Top news देश

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका

rbi e1636442779494
Photo Credit - Twitter/@RBI

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँकेने अहमदनगरमधील म्युनिसिपल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घातली आहे. आरबीआयने या बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधानंतर नगर अर्बन सहकारी बँकेच्या ग्राहकांना 10 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या सहकारी बँकेत गडबड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केलीये.

RBI ने 1949 अंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती आहे. आरबीआयच्या या सूचनेनंतर निर्बंधांचा कालावधी पुढील 6 महिन्यांसाठी कायम राहणार आहे, जो 6 डिसेंबरपासून लागू झालाय.

रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार 6 महिन्यांनंतर सहकारी बँकेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाईल आणि पुढील सूचनांचा विचार केला जाईल. सर्व काही सुरळीत झाले तर निर्बंधात शिथिलता येईल, अन्यथा परिस्थिती जैसे थेच राहील.

बचत बँक खाते किंवा चालू खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. आरबीआयच्या या निर्देशाची प्रत बँकेच्या कंपाउंडमध्ये पेस्ट करण्यात आलीय.

ज्यांना या सूचनांबद्दल तपशीलवार जाणून घ्यायचे आहे ते RBI ची ही प्रत वाचू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधाचा अर्थ नगर सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय, असा घेऊ नये, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. परवाना पूर्वीप्रमाणेच कायम आहे, पण काही बंधने चिकटवण्यात आली.

भविष्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन सूचनाही जारी केल्या जाऊ शकतात आणि नियम शिथिल करता येतील, असंही बँकेने म्हटलं आहे. हे सर्व बँकेच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असेल.

नगर सहकारी बँक निर्बंधांसह व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलंय. त्याची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही बंदी कायम राहील.

महत्त्वाच्या बातम्या- 

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत दर! 

“कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा” 

“देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी केंद्रीय मंत्री झालो” 

‘मला BJP कडून केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट 

“सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरुये”