नवी दिल्ली | सध्या मानवतेवर कोरोनाची संकट आलेलं आहे. तसंच अर्थव्यवस्थेवर देखील कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आरबीआयची नजर असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रिव्हर्स रेपो रेट 4 टक्क्यांवरून 3.75 टक्क्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं.
नाबार्डला 25 हजार कोटींची तर एनएचबीला 10 हजार कोटींची RBI कडून मदत दिल्याचं शक्तीकांता दास यांनी यावेळी जाहीर केलं आहे. तसंच सीडबीला 15 हजार कोटींची मदत आरबीआयने दिली आहे.
जगातल्या प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यांच्या तुलनेने भारताची स्थिती चांगली आहे. कोरोना संकटाचा जगभरातील मार्केटवर परिणाम झाला आहे. ऑटोमोबाईल्स क्षेत्रात विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. मंदीच्या संकटाशी लढण्यास आरबीआय प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
जागतिक मंदीच्या दरम्यान भारताचा विकास दर अजूनही सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आयएमएफच्या मते तो 1. 9 टक्के राहील, असंही दास यांनी यावेळी सांगितलं. कोरोनामुळे जगाला 9 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल, जे बर्याच विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीचे आहे, अशी भितीही दास यांनी व्यक्त केली आहे. 2020 हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठं मंदीचं वर्ष आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
-ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. चंदनवालेंची तडकाफडकी बदली
-चीनमधून तब्बल 6 लाख रॅपिड किट भारतात दाखल
-तबलिगी जमातच्या मौलाना सादसह त्याच्या आठ सहकाऱ्यांविरूद्धही ईडीने केला गुन्हा दाखल
-“विरोधकांच्या 100 पिढ्या जरी आल्या तरी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची संकल्पना वास्तवात येणार नाही”