‘सोसण्याची तयारी ठेवा’; रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जूनच्या सुरुवातीस पुन्हा एकदा व्याजदर वाढवणार आहे जे गेल्या चार महिन्यांपासून सतत स्थिर पातळीच्या वर जाणाऱ्या महागाई दरावर नियंत्रण ठेवणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

व्याजदर वाढणार आहेत. ही काही फार असामान्य गोष्ट नाही. पण व्याजदर किती वाढतील हे मी आत्ताच सांगू शकत नाही, असं शक्तिकांत दास म्हणालेत.

एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बँकेने, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षांतील महागाईचा अंदाज आधीच्या 4.5 टक्क्यांवरून 5.7 टक्क्यांपर्यंत वाढविला होता, तर 2022-23 आर्थिक वर्षांसाठी विकासदराचा (जीडीपी) अंदाजाला 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत कात्री लावली होती.

महागाईला प्रतिबंधासाठी रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकारने सुसूत्रित कार्यवाहीच्या आणखी पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. मागील दोन-तीन महिन्यांत महागाई कमी करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने अनेक पावले उचलली आहेत.

दुसरीकडे, सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यासह उपाययोजना केल्या आहेत, असं ते म्हणाले. या सर्वांचा भाववाढीवर खोलवर परिणाम होईल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“6 व्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही” 

“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”

‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले

‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका

‘अमरावतीची भाकरवडी’ म्हणत दीपाली संय्यद यांचा नवनीत राणांवर घणाघात, म्हणाल्या…