मुंबई | भारताची केंद्रीय बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो दरांत (REPO Rate) वाढ केल्याने सर्वच बँकांचे व्याजदर वाढणार आहेत. त्यामुळे आता बँकेतून कर्ज घेतलेल्या खातेदारांना जादाची परतफेड करावी लागणार आहे.
आरबीआयच्या (RBI) निर्णयानुसार आयसीआयसीआय (ICICI) आणि पीएनबी (PNB) बँकांनी तात्काळ कर्जाच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे ह्या दोन बँकांच्या कर्जदारांची डोकेदुखी वाढणार आहे.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी चलनविषयक धोरणांतर्गत (Monetary Policy) आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. बँकेने रेपो दरांत 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.40 झाला आहे.
आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकांनी 5 ऑगस्ट 2022 पासून लागलीच या नवीन दरांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आता इतर बँकासुद्धा तात्काळ आपले व्याजदर वाढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलेले जाते आहे.
आयसीआयसीआय बँकेचे कर्जदर आता वार्षिक 9.10 टक्के झाला असून तो 5 ऑगस्ट पासून लागू करण्यात आला आहे. बँकेने त्यासंदर्भात एक नोटीस काढून या नव्या निर्णयाची पुष्टी केली आहे.
आयसीआयसीआय बँकेपाठोपाठ आता पीएनबी (Punjab National Bank) बँकेने सुद्धा या नवीन निर्णयाची अंमलबजावणीची पुष्टी केली आहे. आरबीआयने रेपो दर 7.40 टक्क्यावरुन 7.90 टक्के केला आहे. आरबीआयच्या नवीन अध्यादेशानुसार (GR) 8 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
रेपो दर देशातील आर्थिक स्थितीवर ठरवला जातो. त्यामुळे देशातील महागाई (Inflation) आटोक्यात आणता येते. रेपो दरांवरुन व्याजदर ठरविला जातो. त्यावरुन देशातील सर्व खाजगी आणि सहकारी बँकांच्या व्याजदरात चढ-उतार होत असतो.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का
शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी!
“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, ते रात्री…”
गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, उचललं मोठं पाऊल
“राहुल गांधी म्हणजे एक पार्ट टाइम राजनेते”