महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका!

नवी दिल्ली | सर्वसामान्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आज रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसिक पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे तो आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

RBI च्या या निर्णयामुळे सर्वच बँकाचे कर्जाचे व्याजदार पुन्हा वाढतील. त्यामुळे EMI चा अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे.

रेपो दरात वाढ झाल्याने कर्जाचा EMI वाढत असल्याने बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो दर म्हणजे रेपो दर.

या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढेल आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल. त्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे सर्व आगामी काळात महाग होईल.

RBI गव्हर्नरांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. महागाई सातत्याने वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा समस्यांमुळे महागाई वाढली आहे, असं RBI गव्हर्नर म्हणाले.

कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील. जगभरातील आर्थिक घडामोडींमध्ये मंदी आली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?’; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर 

मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादात कंगणाची उडी, म्हणाली… 

महिन्याला 1000 रूपयांची गुंतवणूक करून 2 कोटी जमवा, जाणून घ्या भन्नाट योजना 

“बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी