देश मनोरंजन

#BigBoss14 | वाचा सुखविंदर कौर कशी बनली राधे माँ; फारच रंजक आहे कहानी

नवी दिल्ली | आज ३ ऑक्टोबरपासून बिग बॉसचा १४ वा पर्व सुरू होणार आहे. कलर्स वाहिनीवर हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे. या पर्वात राधे माँ बिग बॉसच्या घरात येणार आहे. राधे माँ यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशाबाबत खूपच चर्चा होत आहे.

देशभरात त्या राधे माँ म्हणून प्रसिद्ध आहे. राधे माँ यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तब्बल ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही पैलूंविषयी जाणून घेऊ. राधे माँ या स्वतःला एक अवतार म्हणून सांगतात.

राधे माँ नेहमी एका देवीसारखे वस्त्र परिधान करतात. त्या नेहमी लाल कपडे आणि त्रिशूलसोबत दिसतात. खूपच कमी लोकांना माहित आहे की, त्यांचे नाव सुखविंदर कौर आहे. १९६५ मध्ये पंजाबमध्ये गुरदासपूरमधील दोरांगला गावात राधे माँ यांचा जन्म झाला.

जेव्हा त्या अध्यात्म क्षेत्राकडे वळाल्या, तेव्हा त्यांनी त्यांचे नाव बदलून राधे माँ केले. वयाच्या १७ व्या वर्षी राधे माँ यांचे लग्न मनमोहन सिंह यांच्याशी झाले होते. मनमोहन सिंह हे मिठाईच्या दुकानात काम करत होते. लग्नानंतर त्यांचे पती मनमोहन यांना नोकरीनिमित्त कतारला जावे लागले.

घराची परिस्थिती नाजूक असल्याने राधे माँ कपडे शिवून आपले पोट भरत होत्या. सध्या ते वेगळे राहत आहे आणि त्यांना कोणतेही मुलबाळ नाही. एका माहितीनुसार, राधे माँ वयाच्या २१ व्या वर्षी रामदिन दास यांना भेटल्या होत्या.

महंत रामदिन दास यांनी सुखविंदर कौर यांना सहा महिन्यांची दीक्षा दिली आणि रामदिन दास यांनीच त्यांना राधे माँ नाव दिले. आज राधे माँ यांचे हजारो भक्त आहे. राधे माँ यांच्या भक्तांच्या यादीत रवी किशन, मनोज वाजपेयी आणि डॉली बिंद्रा सारख्या काही कलाकारांचाही समावेश आहे.

मीडियाच्या अहवालानुसार राधे माँ यांच्या कार्यक्रमाचा खर्च ५ लाख ते ३५ लाखांपर्यंत आहे. राधे माँ यांचे सर्व काम त्यांचे एजंट टल्ली बाबा पाहतात. २०१५ मध्ये राधे माँ यांचा लाल रंगाचा स्कर्ट आणि बूट घातलेला एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यावरून बराच वादही झाला होता.

यावर राधे माँ म्हणाल्या की,”हे कपडे मला माझ्या एका भक्ताने दिले आहे. असं कुणी सांगितलं की, साध्वीने एक प्रकारचेच कपडे घालावे. जर माझे भक्त आनंदी तर मी ही आनंदी असेल.”

या व्यतिरिक्त बिग बॉसची स्पर्धक असलेली डॉली बिंद्रा हिने २०१५ मध्ये राधे माँ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती की, यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सलमान खूप गोड आहे म्हणत दिशा पटानीचा सलमानला ‘या’ गोष्टीसाठी होकार

पंजाबचा दारुण पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं केला मोठा खुलासा म्हणाला…

गंदी बात वेबसीरिजच्या पाचव्या भागाचा इन्टिमेंट सीन शुट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

अखेर नेहा कक्करचं ठरलं; या व्यक्तीसोबत लग्न करणार?

कुणालाही वाटलं नव्हतं, मात्र फक्त 20 धावा करुनही ‘हा’ विक्रम क्रुणाल पांड्यांच्या नावावर!