Top news कोरोना महाराष्ट्र

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत अचानक घट, मात्र धोका कायम; वाचा आजची ताजी आकडेवारी

corona 22 e1641135057122
Photo Credit - Twitter/ @MahaDGIPR

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अशात अचानकपणे कोरोना आकडेवारीत घसरण नोंदवली गेली आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत होत. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्यानं आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आज मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या घटली आहे. आज तब्बल 33 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29,671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

5 जानेवारी रोजी राज्यातील नवीन रूग्णसंख्या 26 हजार 538 होती आता नवी रुग्णसंख्या 40 हजारांच्या पुढं गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी वाढल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 13 हजार 648 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईत लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा! पेरूच्या उत्पादनातून कमावले लाखो रूपये

48 चा झाला बड्डे बाॅय ऋतिक, जाणून घ्या पिळदार शरीराचं सिक्रेट

कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”

 राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस