नवी दिल्ली | सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. लवकरच तुम्हाला महागडं पेट्रोल आणि डिझेल भरण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यात मोठं यश मिळालं आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं लक्ष्य भारताने निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच पूर्ण केलं आहे, असं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती देताना नरेंद्र मोदी म्हणाले.
इथेनॉलवर चालणारी वाहने देशात लवकरच सुरू होऊ शकतात. त्यासाठी ते सरकार आणि कंपन्यांच्या पातळीवर चर्चा पुढे नेत आहेत. हरित आणि पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे, असं नितीन गडकरींनी सांगितलं होतं.
इथेनॉलचे मिश्रण वाढल्यामुळे लोकांना महागडे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यापासून दिलासा मिळणार आहे.
इथेनॉलच्या वापराला चालना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर इंधनावर सुमारे 20 रुपयांची बचत करणं शक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…”
“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”
पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान
“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ