“इतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचं जगावर सावट”

वुहान | सुमारे 8 लाख 57 हजाराहून अधिक लोक जगभरात कोरोनाने संक्रमित झाले आहेत. तर मृतांचा आकडा 42 हजारांहून अधिक झाला आहे. संयुक्त राष्ट्रचे महासचिव एंटोनियो गुटरेश यांनी परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली आहे.

एंटोनियो गुटरेश यांनी या परिस्थितीची इतिहासातील युद्धाशी तुलना केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हे जगासमोरचे सगळ्यात मोठं आव्हान आहे, असं एंटोनियो गुटरेश यांनी म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसने समाजाच्या मुळावर आघात केले आहेत. ज्यामुळे लोकांचे जीवन आणि उपजीविकेवर भयंकर परिणाम झाले आहेत. कोरोना महामारी संकटामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता असून ही मंदी अशी असेल की याआधी अशी मंदी इतिहासात कुणी पाहिली, अनुभवली नसेल, असं एंटोनियो गुटरेश म्हणाले.

संयुक्त राष्ट्रच्या महासचिवांनी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांच्या शक्यतांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-अझीम प्रेमजींचं दर्यादिल… पाहा त्यांनी खरंच किती रक्कम मदत दिलीये

-अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर

-जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा- अजित पवार

-“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”

-कोट्यवधी हिंदूच्या तपासणीसाठी किट देऊ न शकलेलं सरकार ‘तबलिगी मर्कझ’वर खापर फोडतंय- जिग्नेश मेवानी