नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली. कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंच्या प्रसाराचा वेग डेल्टा (Delta) व्हेरिएंटच्या तिप्पट असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव वेगाने होत असला तरी कोरोनाच्या आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन कमी घातक असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉन व्हेरिएंट हात पाय पसरत आहे.
वेगाने परत असलेल्या ओमिक्रॉनची दहशत वाढली असली तरी संशोधनातून दिलासादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने द.आफ्रिका, इंग्लंड,स्कॉटलंड आणि डेन्मार्क या देशातील रूग्णांचा अभ्यास केला.
50 ते 70 टक्के ओमिक्रॉनबाधीत रूग्ण रूग्णालयात भरती न होताच बरे झाले असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या 50 ते 70 टक्के रूग्णांना रूग्णालयात भरती होण्याची गरज भासली नाही.
कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेतल्यानंतर 10 आठवड्यामध्ये ओमिक्रॉनचा धोका टळला असल्याचं देखील या अहवालातून समोर आलं आहे.ब्रिटनमध्ये गेल्या 28 दिवसांत एकूण 14 ओमिक्रॉनबाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले 15 ते 25 टक्के रूग्ण गेल्या 10 आठवड्यात बरे झाले आहेत. विशेष म्हणजे या रूग्णांनी कोरोना लसीचा बुस्टर डोस घेतला नव्हता.
ओमिक्रॉन घातक नसला तरी ब्रिटनमध्ये सध्या ओमिक्रॉनचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ओमिक्रॉनचा वाढता प्रसार बघता ब्रिटन सरकारने नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, देशातील 14 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधीत रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत सर्वात जास्त ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत.
देशात ओमिक्रॉनचा वाढता फैलाव बघता सर्वच स्तरांवरून सतर्कता बाळगली जात आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका बघता पंतप्रधान मोदी यांनीदेखील जनतेला सतर्क आणि सावधान राहाण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यात नाईट कर्फ्यू लागणार का?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक
“ती गाडी कोणाची होती?, त्या दिवसापासून सुशांत सिंह राजपूत…”, मलिकांचा सवाल
संसद आहे की आखाडा?, खासदारांची संसदेत लाथा बुक्क्यांनी तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
“देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर मी तिकीट काढून देतो”
आता लस नाही गोळी घ्या! कोरोनावर उपचारासाठी ‘या’ कंपनीची गोळी लवकरच बाजारात