Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज

नवी दिल्ली | रोजगार (Job) मिळत नसल्यामुळे युवक वर्गात असंतोष आहे. अशातच काही विभागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पोस्ट ऑफिस (Post Office)  आणि रेल्वे (Railway) या विभागात रोजगार मिळत आहे.

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बनासर रेल्वे कारखाने वाराणसीमध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

इच्छुक उमेदवार या पदांसाठी 26 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट indianrailways च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण 374 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 28 एप्रिल असणार आहे.

10वी पास असलेले ITI प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास, 15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

10वी आणि ITI प्रमाणपत्राच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. 50 टक्के गुणांची मर्यादा लागू आहे.

पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रूपये जमा करावे लागतील. परीक्षा आवेदनपत्र दाखल केल्यानंतर प्रवेशपत्र काही दिवसांनी अपलोड करण्यात येतील.

दरम्यान, भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी रेल्वे विभागाची वेबसाईट वेळोवेळी चेक करत रहा. अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी रेल्वे विभागामध्ये उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं” 

‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; सलग सहाव्यांदा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं