खुशखबर! भारतीय पोस्टात ‘आठवी पास’ तरुणांना नोकरीची संधी

मुंबई | भारतीय पोस्टात (Indian Post) येणाऱ्या कालावधीत मोठी भरती (Recruitment) करण्यात येणार आहे. भारतीय पोस्टात मेकॅनिक, इलेक्ट्रिशन, पेंटर, वेल्डर आणि कारपेंटर पदांसाठी जागा निघणार आहेत.

यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोंबर पर्यंत वेळ असणार आहे. विशेष म्हणजे आठवी पास (8th Pass) उमेदवार देखील यावेळी अर्ज करु शकतात.

अर्ज करताना संबंधित क्षेत्राचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच प्रमाणपत्र धारक आणि आठवी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराला 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सदर भरती प्रक्रियेत मेकॅनिक – 1, इलेक्ट्रिशन – 2, पेंटर – 1, वेल्डर – 1 आणि कारपेंटर – 2 या जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसेच मोटार चालक पदासाठी देखील जागा रिक्त आहेत.

अर्जदार 18 ते 30 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. (Recruitment in Indian Post) यावेळी उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेच्या (Competitive Exam) माध्यामातून केली जाणार आहे.

सदर अर्ज भरुन तो The Manager Mail Motor Service, CTO Compound,  Tallakulam, Madurai – 625002 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधनांवर मोठी टीका; म्हणाले, दारुड्याला दारु पिण्यास…

‘राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप’

संजय राऊत यांच्याबाबात मोठी खळबळजनक माहिती समोर; बेहिशेबी रक्कम त्यांनी चित्रपट आणि मद्य…

‘विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव कालवश’

“रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, त्यांच्या…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे थेट आव्हान