मुंबई | भारतात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनची क्रेझ आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांच्या हातात आज स्मार्टफोन पहायला मिळतो. तरूण पिढीच्या हातात दोन दोन स्मार्टफोन तर सर्रास आहेत.
बाजारात वेगवेगळ्या स्मार्टफोनची काही कमी नाही. प्रत्येकाला आपापल्या परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध आहेत. अशातच आता Redmi 10A लाँच झाला आहे.
Redmi 9A ची पुढील आवृत्ती म्हणून Redmi 10A लाँच करण्यात आला आहे. Redmi 10 मालिकेतील कंपनीचा परवडणारा स्मार्टफोन आहे. Redmi 10A ची अनेक वैशिष्ट्ये Redmi 9A सारखीच असल्याचं सांगिण्यात आलं आहे.
यामध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 10A मध्ये 128GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
Redmi 10A सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे 8,300 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत त्याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.
Redmi 10A शॅडो ब्लॅक, स्मोक ब्लू आणि मूनलाईट सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतात कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीने काहीही सांगितलेले नाही.
Redmi 10A मधील मेमरी मायक्रो-SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.0 देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! पुण्यात लागोपाठ सिलेंडर्सचे स्फोट; परिसरात भीतीचं वातावरण
“आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”
Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज