लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

नवी दिल्ली | दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन करताना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली होती. ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाचा वेग वाढवणार असल्याचं मोदी म्हणाले होते.

देशात आतापर्यंत 18 वर्षांच्या पुढील सर्वांना लस देण्यात येत होती. पण ओमिक्राॅन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानूसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. परिणामी आता या लसीकरणाच्या प्रक्रियेला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.

ओमिक्राॅनच्या धर्तीवर जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. युरोपीयन देशांमध्ये ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी सर्वत्र चिंता वाढली आहे.

केंद्र सरकारनं 12 वर्षांच्या पुढील मुलांना लस देण्यास मान्यता दिली आहे. पण प्रत्यक्षात सध्या फक्त 15 ते 18 वयोगटातील मुलांच लसीकरण होणार आहे. परिणामी या लसीकरणासाठी कोवीन या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

1 जानेवारीपासून मुला-मुलींसाठी नोदणी करता येणार आहे.  Cowin या पोर्टलवर नोंदणी करताना विद्यार्थ्यांचं शाळेतील ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणा आहे. परिणामी विद्यार्थ्यांच ओळखपत्र महत्त्वाचं आहे.

मुलांचे ओळखपत्र नक्की सोबत असुद्या. कारण त्या ओळखपत्राद्वारे मुलाचं वय 15 आहे हे ओळखता येणार आहे. परिणामी पालकांनी ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचं आहे.

नोंदणीनंतर 3 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरवात होणार आहे. सध्यातरी मुलांना कोव्हॅक्सीन ही लस देण्यात येणार आहे. दोन डोसमधील अंतर हे 28 दिवस असणार आहे.

लहान मुलांसोबतच 60 वर्षांच्या पुढील नागरिकांना बुस्टर डोस देण्यास लवकरच सुरूवात होणार आहे. परिणामी ओमिक्राॅनविरूद्ध लढण्यासाठी सरकारनं पुर्ण तयारी केल्याचं दिसत आहे.

दरम्यान, लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्याची सुचना सुद्धा केंद्र सरकारनं दिली आहे. सध्या देशात सर्व नागरिकांना 100 टक्के पहिला डोस देण्यावर सराकर काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर”