Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रियाला सीबीआयचा पुन्हा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत सीबीआयनं रियाला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मुंबई आणि बिहार पोलीसांनंतर सीबीआय आणि एनसीबीसारख्या देशातील उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत आहेत.

सुशांत सिंह राजपूतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच सुशांत प्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांत प्रकरणी रियावर अनेक आ.रोप करण्यात आले होते. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं एनसीबी याप्रकरणी सध्या शोध घेत आहे. एनसीबीला रिया विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली होती. 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया नुकतीच बाहेर आली आहे.

रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबरमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला होता.

या औषधांमुळे सुशांत सिंह राजपूतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता, असंही रियानं दिलेल्या त.क्रारीत म्हटलं होतं. रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे नुकतीच सोपविली होती. मात्र, सीबीआयनं बॉम्बे हायकोर्टात रियानं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले आहेत ते सर्व आरोप काल्पनिक आहेत. तसेच रियानं कोणत्याही पुराव्याविना बिनबुडाचे आ.रोप केले आहेत, असं सीबीआयनं म्हटलं आहे. तसेच सीबीआयनं यावेळी मुंबई पोलिसांना देखील झापलं आहे.

मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याअगोदर तपास करायला हवा होता. एकाच गोष्टीसाठी दोन एफआयआर दाखल केल्या जाऊ शकत नाहीत. हे पाहता मुंबई पोलिसांनी रियाची तक्रार आम्हाला फॉरवर्ड करायला हवी होती, असंही सीबीआयनं म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

अभिनेत्री सारा अली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोन यांचीही एनसीबीनं याप्रकरणी चौकशी केली आहे. एनसीबीनं याप्रकरणी अनेकांना ग.जाआड देखील केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-मुंबईच्या ‘या’ खेळाडूनं विराट कोहलीचा माज मोडला; पाहा व्हिडीओ

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवरून महाराष्ट्र सरकारमध्ये चुरस; ‘ही’ नावं चर्चेत

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा घणाघात! महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा?

बारमध्ये स्त्रियांना ‘नो शर्ट फ्री बियर’ ऑफर! मुंबईतील ‘या’ बारमधील धक्कादायक प्रकार

कोरोनानंतर भारतीयांमोर नविन संकट! वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा