नवी दिल्ली | आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करणारा हा दिवस काहीजणांसाठी मोलाचा ठरतो. तर काहींची मन देखील दुखावतात.
लग्नानंतर देखील अनेक जोडपी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. आपल्या लाडक्या बायकोसाठी नवरा एखादं छानसं गिफ्ट घेऊन येतो. आजच्या दिवशी प्रेम व्यक्त केल्यानं नातं घट्ट होतं, असं मानलं जातं.
नवरा बायको यांच्यातील नातं खूप नाजूक असतं. जसा जसा वेळ जातो, तसं हे नातं अधिक घट्ट होत असतं. मात्र, काही अशा घटनांमुळे नात्यात दुरावा देखील निर्माण होत असतो.
अशीच एक घटना एका नवऱ्यासोबत घडली आहे. एका पोर्टलवर आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यावेळी त्याने धक्कादायक अनुभव शेअर केला.
लग्नानंतर माझं बायकोवरचं प्रेम कमी झालं नाही, असं नवऱ्याने सांगितलं. लग्नानंतर आम्ही दोघेही खुश होतो. संसार चांगला होता. मात्र, काही काळानंतर माझ्या बायकोच्या स्वभावात मला काही बदल जाणवला, असंही नवऱ्याने सांगितलं आहे.
एके रात्री आम्ही झोपलो असताना माझी बायको अचानक झोपेत किंचाळली. त्यावेळी ती जे काही बोलली ते ऐकून मला धक्काच बसला. झोपेत तिने माझ्या जिवलग मित्राचं नाव घेतलं.
माझ्या जिवलग मित्रावर तिचं प्रेम होतं, असं ती झोपेत म्हणाली. त्यानंतर माझा माझ्याच कानावर विश्वास बसला नाही, असंही नवऱ्याने यावेळी सांगितलं आहे.
त्यानंतर मी माझ्या बायकोचा पाठलाग केला. त्यावेळी त्या दोघांना मी एकमेकांना भेटताना पाहिलं. त्यानंतर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मात्र, जे मी पाहिलं ते सत्य होतं, असंही त्याने सांगितलं आहे.
माझं माझ्या पत्नीवर खुप प्रेम आहे. तिचं माझ्या बेस्ट फ्रेंडशी रिलेशन असलं तरी मी तिला सोडू शकत नाही, अशा भावना त्याने पोर्टलवर व्यक्त केलंय.
दरम्यान, नवऱ्याने त्याचं नातं टिकवण्यासाठी लोकांचा सल्ला देखील घेतला. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळे सल्ले देखील दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”
“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका
“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”
शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जारी, वाचा काय आहेत निर्बंध