कोरोना पुणे महाराष्ट्र

कौतूकास्पद! रक्ताच्या नात्यांनी अंत्यसंस्कारासाठी नाकारलं पण माणुसकीच्या नात्याने निभावलं; सरपंचाने घातला अनोखा आदर्श

पुणे | सध्या कोरोनाने सगळीकडे एखाद्या दानवाप्रमाणे हैदोस घातला आहे. प्रशासन आणि आरोग्ययंत्रणा युद्धपातळीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनाग्रस्तांचा दिवसेंदिवस आकडा हा वाढतच चालला आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात जात, पात न पाहता सर्वजण काम करत आहेत. पण आपली रक्ताची नातीच उलट या काळात साथ सोडून देत असल्याचं चित्र दिसत आहे आणि अशावेळी माणुसकी कामाला येते. याचाच आदर्श एका सरपंचाने सर्वांना घातला आहे.

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात दोन कोरोना संशयितांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्या दोघांच्या मृतदेहावर मृतांच्या नातोवाईकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी असमर्थता दर्शवली. कोरोनामुळे आपली रक्ताची नाती दूर झाल्याचं हे जिवंत उदाहरण. मात्र समाजात अजूनही माणुसकी आहे कारण त्या मृतदेहांना मंचरचे सरपंच दत्ता गांजळे सरपंचाने मुखाग्नी दिल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतः हॉस्पिटलमधून दोन्ही मृतदेह घेऊन या दोन्ही मृतांवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलं.

दरम्यान, सरपंच दत्ता गांजळे यांचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे. देशात या संकटाविरूद्ध शुर जवानाप्रमाणे पोलीस खातं, डॉक्टर, परिचारिका आणि नेतेमंडळी काम करत आहे. मात्र अशातच दत्ता गांजळे यांनी केलेल्या कार्याने सर्वांना एक आदर्श घालून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादमध्ये हृदयद्रावक घटना! तीन सख्ख्या भावांसह पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने एसटी कर्मचाऱ्याने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात?; उद्धव ठाकरे म्हणाले

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार- रावसाहेब दानवेंचा टोला

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…