Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

संबित पात्रांनी विचारला POK चा फुलफॉर्म; ‘या’ अभिनेत्रीला देता आलं नाही उत्तर!

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत्यांदरम्यान काही दिवसांपासून वा.द चालू आहेत. कंगनानं मुंबईची तुलना POK म्हणजेच पाकिस्तान अधिकृत काश्मीर बरोबर केली होती. यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी कंगनावर आपली तोफ डागलली आहे. या वा.दात चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी उडी घेतली आहे. मात्र, बॉलिवूड मधील एका अभिनेत्रीला POKच्या मुद्द्यावर बोलणं चांगलंच महागात पडलं आहे.

‘बिग बॉस 11’ नंतर अभिनेत्री अर्शी खान आपल्या हॉट लुकमूळं चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री अर्शी खान सोशल मीडियावर सध्या ट्रोल होत आहे. मात्र, अर्शी खानचं ट्रोलिंग मागचं कारण नवल वाटावं असंच आहे.

अर्शी खान हिने एका डिबेट शो दरम्यान कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान चालू असलेल्या वा.दात उडी घेतली होती. अर्शी खान या डिबेट शोमध्ये पीओकेला वारंवार पाकिस्तान असं म्हणत होती. या डिबेट शोमध्ये भाजप नेते संबित पात्रा देखील सामील होते. डिबेट चालू असताना संबित पात्रा यांनी अर्शी खानला पीओकेचा फुलफॉर्म विचारला मात्र तिला याचं उत्तर देता आलं नाही.

डिबेटमध्ये अर्शी खान पीओकेला वारंवार पाकिस्तान म्हणत होती. यावर संबित पात्रा यांनी आक्षेप घेतल्यानंतर दोघांमध्ये तू तू में में झाली. यानंतर संबित पात्रा यांनी अर्शी खानला पीओके म्हणजे पाकिस्तान नसल्याचं सांगितलं.

ज्या विषयावर चर्चा आयोजित केली होती, त्या विषयाची माहिती नसल्यानं सध्या अर्शी खान सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. संबित पात्रा यांनी यावेळी ज्या खाजगी चॅनेलनं डिबेट आयोजित केलती त्या टीव्ही चॅनेलवर देखील निशाणा साधला आहे.

दरम्यान, तुम्ही अती हुशार लोकांना डिबेटसाठी बोलावलं आहे. ज्या लोकांना पीओकेचा अर्थही माहित नाही, असं म्हणत संबित पात्रा यांनी चॅनेलवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी शौविकनं अखेर मौन सोडलं; ‘या’ व्यक्तींच्या नावाचा खुलासा करत दिली महत्वाची माहिती

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या फार्महाऊसवर रियापूर्वी ‘ही’ अभिनेत्री येत होती

सुशांतच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा! सुशांतनं मृ.त्युच्या एक दिवस अगोदर केली होती ‘ही’ गोष्ट

ऐकावं ते नवलंच! कुत्र्यांमध्ये भांडण झाल्यानं ‘या’ अभिनेत्यानं पत्नीला दिला घटस्फोट

धक्कादायक! रिया आणि सुशांतनं ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून ‘ही’ गोष्ट केली होती