जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर; 100 जीबी डाटा मिळणार मोफत

मुंबई | रिलायन्स जिओच्या सिमकार्डवरून दुसऱ्या कोणत्याही सिमकार्डला संपर्क करण्यासाठी ग्राहकांकडून जिओने रक्कम आकारण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाला अन्य नेटवर्कवर संपर्क साधण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारला जात आहे. याची भरपाई म्हणून जिओने ग्राहकासांठी खास ऑफर आणली आहे.

रिलायन्स जिओने ग्राहकांना 6 वेगवेगळी टॉप-अप व्हाऊचर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्ये 10 रुपये, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपयांचे टॉप-अप व्हाऊचर ग्राहकांना मिळणार आहेत.

20 रुपयांचे रिचार्ज केल्यावर 2 जीबी डेटा, 50 रुपयांच्या रिचार्जवर 5 जीबी डेटा, 100 रुपयांवर 10 जीबी डेटा, 500 रुपयांवर 50 जीबी डेटा आणि 1 हजार रुपयांच्या रिचार्जवर 100 जीबी डेटा मोफत मिळू शकेल.

टेलिकाॅम क्षेत्रात मक्तेदारी निर्माण केलेल्या जिओने आता ग्राहकांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ग्राहकांना खूष करण्यासाठी जीओ नवनवीन ऑफर घेऊन येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गुरूला पद्मश्री मिळाल्याने शिष्याचा आनंद द्विगुणीत! म्हणतो….

-पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे- नितीन गडकरी

-गेले 13 वर्ष लतादिदी मला ‘पद्मश्री’ मिळावा म्हणून प्रयत्न करत होत्या- सुरेश वाडकर

-पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; उद्धव ठाकरे कारवाई करणार का??

-उद्धव ठाकरेंची रामावर श्रद्धा असेल तर त्यात गैर काय आहे?; आव्हाडांनी केली उद्धव ठाकरेंची पाठराखण