मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम यांच्यात मालमत्ता व्यवहार झाल्याचा ठपका ईडीनं मलिक यांच्यावर ठेवला आहे.
मनी लाॅड्रिंग प्रकरणातही मलिक यांचा सहभाग असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता मलिकांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
अशातच आता भाजपकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात राहणार नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेतून काही विशिष्ट प्रवृत्ती मुंबईसह देश अस्थिर करू पाहाताहेत, असं चित्र स्पष्ट होतंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
या प्रवृत्तींना तातडीनं चाप लावा, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलं आहे.
मुळात 2017 पासून ईडीनं तपास सुरू केलेल्या प्रकरणांची परिणिती अल्पसंख्यमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित वगैरे ओरड करण्यात अर्थ आहे का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
देशविघातक कारवाया करणाऱ्या तीन प्रकरणांच्या चौकशींतून झालेल्या कारवाईस विरोध कशासाठी?, असं म्हणत त्यांनी मलिकांवर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही देशहिताच्या कारवाईला समर्थन देणार की नाही? उत्तर कृतीतून देण्याची आज संधी आहे. देशद्रोह्यांशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हद्दपार करा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, त्यांचा राजीनामा नको, असा कुणाचा दबाव असेल तर तो झुगारून टाका, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन देखील केलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार
“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”
पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये
मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू