रायगड | रायगड (Raigad) किल्लावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जानता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या समाधीसमोर पिंडदानाचा विधी सुरु असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरला.
यानंतर समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या धक्कादायक प्रकाराने शिवाजी महाराजांचे अनुयायी संतापले आहेत. सगळीकडे या धार्मिक प्रकराबाबत संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकाराची प्राधान्याने गंभीर चौकशी करुन तेथे उपस्थित असलेल्या पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केली आहे.
शनिवारी रायगड किल्ल्यावर शाक्त पद्धतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी संभाजी ब्रिग्रेडचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि शिवाजी महाराजांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काही लोक त्याठिकाणी पिंडदानाचा विधी करत होते. पिठाचे गोळे, फुले आणि इतर साहित्य पाहून, हा प्रकार पिंडदानाचा असला पाहिजे, याची सर्वांना खात्री झाली.
संभाजी ब्रिग्रेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भोसले (Suryakant Bhosale) व तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी या प्रकाराला विरोध केला आणि पिंडदान करणाऱ्या लोकांना जाब विचारला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यानच्या गोंधळात पाऊस आणि धुक्याच्या मदतीने कथित प्रकार करणाऱ्या लोकांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी पोलीस आणि पुरातत्व खाती एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्यचा आरोप ब्रिग्रेडचे संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी केला.
यापूर्वी देखील दिवंगत शिवशाहीर बळवंत पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) यांच्या अस्थींचे पूजन शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर करण्यात आल्याचा कथित प्रकार समोर आला होता. त्यामुळे सध्य लोकांत संतापाची लाट पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या –
संतोष बांगर यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया; “माझी बहीण आणि पत्नी जर…”
अब्दुल सत्तारांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका; म्हणाले, पुढील दहा जन्म तुमची…
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दहा लाखांचा दंड
“…तर तो भाजपचा निर्णय असेल”; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर आशिष शेलारांची स्पष्टोक्ती