बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उलटी उडी मारली अन्…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | प्रेम हे आंधळं असतं, असं म्हटलं जातं. फक्त विश्वास नावाच्या दोरीवर प्रेम टिकून असतं. प्रेमात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. अनेक जोडपी आपल्या नात्यातील प्रेम तपासण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत असतात किंवा स्वतःपुढे एक वेगळं चॅलेंज ठेवत असतात.

या गेम खेळताना काहीवेळा कपल्स आपला जीव देखील धोक्यात टाकतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपल्या बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवून एक तरुणी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी झाडाच्या उंच फांदीवर चडली आहे. या तरुणीचा बॉयफ्रेंड झाडाच्या खाली उभा आहे. तरुणीने बॉयफ्रेंडच्या दिशेला आपली पाठ केली आहे. हे कपल ट्रस्ट गेम खेळताना दिसत आहे.

आपल्या बॉयफ्रेंडच्या दिशेने पाठ केली असल्याने बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवत ही तरुणी उलट्या दिशेने स्वतःला झोकून देते. आपला बॉयफ्रेंड आपल्याला नक्की झेलेल असा विश्वास या तरुणीला असतो. यामुळे ती एकप्रकारे उलट्या दिशेने उडी मारते.

बॉयफ्रेंडने देखील दोन्ही हात वर करुन तिला आपल्या हातांमध्ये झेलतो. तरुणीला झेलताना या तरुणाचा थोडा तोल जातो. मात्र, तरी देखील तो तरुण तिला आपल्या हातामध्ये झेलतो.

यावेळी ही तरुणी थोडी घाबरलेली दिसते. परंतु आपल्या बॉयफ्रेंडच्या विश्वासावर ती स्वत:ला झोकून देते. तिचा बॉयफ्रेंड देखील आपल्या गर्लफ्रेंडचा विश्वास जिंकतो. ज्यावेळी तरुणी स्वत:ला झोकून देते त्यावेळी पाहणाऱ्याच्या देखील काळजाचा ठोका चुकतो.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. परंतु त्याबरोबरच तरुणीला पकडताना मोठी दुर्घटना घडली असती तर? अशी चिंता देखील काही लोक व्यक्त करत आहेत.

https://www.instagram.com/p/CS8WeoxlMLO/

महत्वाच्या बातम्या –

दीपिका लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? परिणिती चोप्रा म्हणाली…

‘शेरशाह’ चित्रपटासाठी सिध्दार्थने घेतलं तब्बल ‘इतके’ कोटी रुपये मानधन

…म्हणून नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावर डोकं ठेवलं; पाहा व्हिडीओ

हॉट सीन करताना मी प्रचंड घाबरले मग बॉबीने…; ‘आश्रम’ वेबसिरीजमधील अभिनेत्रचा खुलासा!

सलमान खानला अडवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफच्या जवानाचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडीओ!