‘कल हो ना हो’ची जिया आठवते का???; पाहा 17 वर्षांनंतर किती बदलली

मुंबई | बाॅलिवुड मध्ये बालकलाकार प्रसिद्ध आहेत. 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा या कलाकारांसोबत दुसर्‍या ही कलाकाराला पसंती मिळाली होती. शाहरूख खानचा ‘कल हो ना हो’ या गाजलेल्या सिनेमातील चिमुकली जिया आठवते? गोंडस चेहऱ्याची, निष्पाप जिया आता मोठी झाली आहे. तिचे खरे नाव झनक शुक्ला आहे.

झनक शुक्लाने 2003 मध्ये कल हो ना हो या चित्रपटातुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. झनकचे फोटो तीची आई सुप्रियाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत आणि तिच्या विषयी माहिती दिली आहे. झनक शुक्लामधे 17 वर्षानंतर खूप बदल झालेला आहे. तुम्ही हे फोटो पाहून आश्चर्यचकीत व्हाल, शिवाय तिला ओळखनार ही नाहीत. यात, झनकने आपल्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते सध्या काय करत आहेत या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.

Jhanak Shukla

झनक म्हणते “चित्रपटसृष्टीशी माझे संबंध खूप जुने झाले आहेत. माझे आई व वडील बर्‍याच काळापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणे मला फार कठीण नव्हते. जेव्हा मी लहान होते तेव्हा आई बरोबर शूट वर जायची. तेव्हापासून माझ्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात झाली. झनकची सगळ्यात प्रथम जाहिरातीसाठी निवड झाली होती.

ती म्हणते, मी लहानपणापासूनच भावनिक होते आणि त्या जाहिरातीतील माझ्या पात्राची आवश्यकताही भावनिक होती. आणि ती जाहिरात प्रसिद्ध झाली. त्या जाहिरातीला ‘बेस्ट एडवर्टाइजमेंट ऑफ द ईयर’ सन्मान मिळाला. टीव्ही सीरियल करिश्मा का करिश्मात झनक शुक्लाने रोबोटची भूमिका केली होती.

jhanak

बाल कलाकार म्हणून, त्या भूमिकेला खूप प्रसिद्धी आणि प्रेम मिळालं. आता जरी झनक बॉलिवूड आणि चित्रपट सृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कालांतराने तिचा लूक खूप बदलला आहे.

‘कल हो ना हो’ सारख्या मोठ्या पडद्यावरील चित्रपटांपासून ते ‘वन नाईट विथ किंग’ या हॉलिवूड चित्रपटापर्यंत काम करण्याची संधी तिला मिळाली. एक शो हिट झाल्यानंतर मला अधिक काम मिळू लागले. ती लहानपणी म्हणायची मी एक मोठी अभिनेत्री होण्यासाठी प्रयत्न करणार, पण आता समजले आहे की अभिनय हा एक करिअरचा एक कठीण पर्याय आहे.

jhanak Shukla now

अभिनय कारकीर्दीत परत येण्याचा विचार का करत नाही? असे काही लोक मला विचारतात. पण मी खरं सांगते सध्या तर मी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे, आजकाल तीने साबण बनवण्याचे काम सुरू केले आहे. ते काम करत असताना मला डोंगरावर जाऊन माझे उरलेले आयुष्य जगायचं आहे. मला वाटते की ही आजची वेळ आपल्यासाठी आहे, कारण उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही.

चित्रपटात तिच्या निरागसता आणि संवाद बोलण्याने लोकांची मनं जिंकली. यानंतर, झनक 2006 मध्ये आलेल्या डेडलाइन चित्रपटात आणि वन नाईट विथ किंगमध्ये दिसली. चित्रपटांशिवाय झनकने सिरियलध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-