देश

मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची सर्व जबाबदारी सरकार घेईल, असं आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी सुमारे 35 हजार मजूरांना रेल्वेने त्यांच्या गावी पाठण्यात आल्याची माहिती दिली आहे. मजूरांच्या प्रवासाचा सर्व खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचंही यावेळी सिसोदीयांनी सांगितलं आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनचा फटका देशभरातील कामगार आणि मजूर वर्गाला बसला. या कामगारांना आपल्या घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली.

दरम्यान, अनेक कामगार सध्याच्या घडीला रस्त्याने चालत, मिळेत त्या वाहनाने स्वतःचा जीव धोक्यात घालत आपल्या घराकडे प्रवास करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मजुरांना अपघातात आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-‘श्रीमंत देश लॉकडाउन वाढवू शकतात, पण गरीब देश…’; चेतन भगतचा सरकारला टोला

-“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

-केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’; अशोक चव्हाणांची सडकून टीका

-उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

-सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात