Top news देश

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

delhi

नवी दिल्ली | देशात आणि जगभरातच ओमिक्रॉन(Omicron) व्हेरिएंटची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. दररोज कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) नवे रेकॉर्ड बनवत आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडत चालली आहे.

आता दिल्ली सरकारने कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांवर आणखी कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेत, आता अधिक कठोर पावले उचलत दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या कोरोनामुळे राजधानी दिल्लीत आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बार आणि हॉटेल बंद करण्यात आले असून फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहे.

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) राज्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांच्या वतीने मंगळवारी या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. आता फक्त ज्यांना सूट देण्यात आली आहे (एक्झम्प्टेड कॅटेगरी) तेच खाजगी कार्यालये उघडू शकतील. म्हणजेच, दिल्लीतील इतर सर्व खाजगी कार्यालयातील कर्मचारी घरून काम करतील.

याआधीही दिल्ली सरकार वर्क फ्रॉम होम पद्धतीने सर्व सरकारी कार्यालये चालवत होतं. त्याचबरोबर केवळ अत्यावश्यक सेवांशी संबंधित कार्यालयांनाच कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरू नये यासाठी कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

आता खासगी कार्यालयांमधील 50 टक्के क्षमतेचे उच्चाटन करून ती पूर्णपणे बंद करून वर्क फ्रॉम होम पद्धतीने चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय आणखी एक मोठा निर्णय घेत DDMA ने दिल्लीतील सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त रेस्टॉरंट्समधून होम डिलिव्हरी आणि खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची सुविधा असेल. म्हणजेच आता रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण खाण्याच्या सुविधेवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये थोडी घट झाल्याचं दिसून आलं आहे.मात्र,कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 277 जणांचा मृत्यू (Corona Deaths)झालाय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 461 वर पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ नियमात केला बदल 

सर्वात मोठी बातमी- ‘वोडाफोन आयडिया’वर सरकारची मालकी 

अजूनही लस न घेतलेल्यांनो सावधान; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत दिली महत्वाची माहिती, म्हणाले ‘जानेवारी अखेरपर्यंत ही लाट…’