आज 1 वाजता लागणार इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षांचा निकाल!

मुंबई | कोरोना संसर्ग रोगामुळे इयत्ता दहावी-बारावीच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी तसेच बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज 20 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

हा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थी www.mahersult.com या अधिकृत वेबसाईटवरून पाहू शकतात.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक 22 सप्टेंबर ते8  ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती.

तर इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या- 

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल, पाहा आजचा दर

“राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात”

“सामान्य माणसाला अच्छे दिन यावे, महागाई नसावी हेच नरेंद्र मोदींचं ध्येय”

अजित पवारांना या छाप्यांनी फारसा पडणार नाही- रामदास आठवले

‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव’; ‘या’ नेत्याने उघड केलं गुपित

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल- छगन भुजबळ