मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; संभाजीराजेंची मागणी

सातारा | आरे आणि नाणार प्रमाणेच मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठासाहित’ महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचं नामकरण हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं करण्याची मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठं स्थान आहे हे आपणास माहितच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणं आवश्यक आहे. सुरुवात म्हणून आपण सार्वजनिक स्थळांचं नामविस्तार करणं आवश्यक आहे, असं संभाजी राजेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आपणास अजून एक विशेष विनंती की मराठा आरक्षणाकरीता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घ्या, अशी मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-