Top news देश मनोरंजन

आरोप सिद्ध झाल्यास अभिनेत्री रिया चक्रवर्तीला होऊ शकते ‘ही’ शिक्षा!

फोटो सौजन्य - विरल भयानी

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाने आता नवीन वळण घेतलं आहे. त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला पोलिसांनी अ.टक केली आहे. या प्रकरणात ड्र.ग्जचा अँगल समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे ही त्या प्रकरणात झालेली अ.टक आहे.

रियाला न्यायालयापुढे हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात रिया दोषी आढळली तर तिला काय शिक्षा होणार याची एकच चर्चा रंगू लागली आहे.

मुद्दा क्र. 1- रिया चक्रवर्तीने ड्र.ग्ज घेतल्याची कबुली दिल्यानंतर तिला अ.टक करण्यात आली. अं.मली पदार्थ प्रतिबंध कायदा- कलम 20 ( ब ), कलम 27 ( अ ), कलम 28, कलम 29 आणि या कलमांतर्गत तिला अ.टक झाली आहे.

मुद्दा क्र. 2- कलम 20 (ब) – अं.मली पदार्थांचे उत्पादन, विक्री, खरेदी, वाहतूक, आंतरराज्यीय आयात आणि निर्यात किंवा वापर यासाठी शिक्षा सुनावली जाते. या कलमामध्ये गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. यामध्ये 10 ते 20 वर्षांपर्यत जेल आणि एक ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

मुद्दा क्र. 3- कलम 27 (अ) – ना.र्कोटिक ड्र.ग्ज किंवा सा.यकोट्रोपिक घटक म्हणजे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा घटक घेतल्यास त्या व्यक्तीला एक वर्ष जेल आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

मुद्दा क्र. 4- कलम 28 आणि कलम 29 अंतर्गत ड्रग्जच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे सहभाग असला तरी जेल आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे या कलमाअंतर्गत न्यायालय शिक्षा सुनावते.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतसिंग राजपूतच्या मृ.त्यूबाबत ‘या’ वकिलानं केला अत्यंत धक्कादायक खुलासा

“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, किती लोकांची तोंड तुम्ही बंद करणार आहात?”

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! भायखळा तुरुंगात रियाची रवानगी होणार

“काहीच पुरावे नसताना रियाला….; कोणताही बाप हे सहन करू शकत नाही”

रियानं ड्रग्जचं सेवन का केलं?; रियानं स्वतः केला हादरवून टाकणारा खुलासा!