मुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांतच्या मृ.त्यूच्या शोधापासून सुरू झालेला हा प्रवास आज चित्रपट सृष्टीतील अं.मली पदार्थ प्रकरणापर्यंत येवून पोहचला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे.
सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यामुळं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं आहे. तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्यासह अनेकांना एनसीबीनं याप्रकरणी ता.ब्यात घेतलं आहे. न्यायालयानं यापूर्वी रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची को.ठडी सुनावली होती. न्यायालयानं याप्रकरणी आज पुन्हा एकदा महत्वाची सुना.वणी केली आहे.
रिया आणि शौविकसह याप्रकरणातील इतर सहा जणांना आज एनडीपीएस कोर्टात हजर केलं गेलं होतं. यावेळी न्यायालयानं रिया आणि शौविकसह इतर 6 जणांनाही आणखी 14 दिवसांची न्यायालयीन को.ठडी सुनावली आहे. यामुळे आता ५ ऑक्टोबर 2020 पर्यंत रिया चक्रवर्ती जे,लमध्येच राहणार आहे. 5 ऑक्टोबर नंतर न्यायालय याप्रकरणी कोणता निकाल देईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
रिया चक्रवर्तीचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियाच्या सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, कोर्टानं अद्याप या जामीन अर्जावर कोणताही निकाल दिला नाही. कोर्टानं अद्याप या जामीन अर्जावर केव्हा सुनावणी होईल हे देखील सांगितलं नाही. तसेच अं.मली पदार्थ प्रकरणी मुख्य आरोपी असणाऱ्या रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांना रि.मांडवर घेण्यासाठी एनसीबीनं अद्याप न्यायालायाकडं कोणतीही मागणी केली नाही.
दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्तीनं एनसीबीच्या चौकशी दरम्यान इंडस्ट्रीतील 25 ‘ए’ लिस्टर्स सेलेब्रिटीची नावे उघड केली आहेत. याप्रकरणी आता एनसीबीच्या तपासात बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि नम्रता शिरोडकर यांचीही नाव समोर आली आहेत.
तसेच सुशांतनं ड्र.ग्जचे हेवी डोस केव्हा सुरु केले याचाही खुलासा रियानं चौकशी दरम्यान केला आहे. सुशांत सिंह राजपूत केदारनाथ चित्रपटापूर्वीच ड्र.ग्ज घेत होता. मात्र, सुशांतनं केदारनाथ सिनेमानंतर ड्र.ग्ज घेणं वाढवलं होतं, अशी माहिती रियानं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मणिकर्णिका फिल्म का सोडली?, सोनू सूदनं कंगणा राणावतबद्दल केला धक्कादायक खुलासा!
मोदी सरकारची मनमाची चालू देणार नाही; ‘या’ कारणामुळं शरद पवारांनी धरला उपवास!
…म्हणून रतन टाटांनी ‘या’ गाडीला दिलं चक्क कामगाराचं नाव; रेकॉर्डब्रेक विकली गेली गाडी!
‘क-क कंगना करणाऱ्या राज्य सरकारनं माझा नाद सोडला तर…’; कंगनानं राज्य सरकारला पुन्हा डिवचलं
‘रियाचं ड्र.ग्ज कनेक्शन दह.शतवादी गटापर्यंत आहे’; NCB प्रमुख राकेश अस्थाना यांचा दावा